सहजपूर च्या सरपंचपदी सविता मेहेर यांची बिनविरोध निवड

दौंड : दौंड तालुक्यातील सहजपूर गावच्या सरपंचपदी सौ. सविता दत्तात्रय (बापूसाहेब) मेहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सहजपूर च्या सरपंच प्रियांका राजेंद्र माकर यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपदाचे स्थान रिक्त झाले होते.

सरपंच पदाच्या रिक्त स्थानावर सौ. सविता दत्तात्रय (बापूसाहेब) मेहेर यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी अन्य कोणताही उमेदवारी अर्ज न आल्याने व 11 ग्रामपंचायत सदस्यांनी सविता मेहेर यांच्या सरपंच पदाला सहमती दर्शविल्याने सविता बापूसाहेब मेहेर यांची सहजपूरच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

सविता बापूसाहेब मेहेर यांच्या निवड प्रक्रियेदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जीवन म्हेत्रे, माजी सरपंच गजधणे, छबन माकर, पै. सागर मारकड, उद्योजक बापूसाहेब मेहेर, सुरेश थोरात माजी सरपंच चांगदेव म्हेत्रे, बंडू गायकवाड, विजय म्हेत्रे, प्रदीप म्हेत्रे, महेश म्हेत्रे, अर्जुन म्हेत्रे, बापू थोरात, सिताराम वेताळ, विठ्ठल म्हेत्रे, विशाल म्हेत्रे, नितीन कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.