मुंबई : राज्यात सध्या कोण कुणाचा राजकीय मित्र आहे आणि कोण कुणाचा राजकीय शत्रू याचा काही जनतेला उलगडा होईना. महाविकास आघाडी (MVA) म्हणून एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (Rashtravadi Congress) च्या नेत्यांमध्ये दररोज तू-तू मैं-मै होताना दिसत आहे.
काल खासदार संजय राऊत हे माध्यमांसमोर बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांचा विषय निघाल्यानंतर ते थुंकले होते. त्यांच्या या कृतीवरून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून मोठी टीका करण्यात आली होती. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांची माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता नेत्यांनी तारतम्य बाळगावे असे त्यांनी म्हटले होते. अजित पवारांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना धरणात मुतण्यापेक्षा थुंकण चांगलं असं संजय राऊत म्हणाले.
यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना बोललं म्हणून काय अंगाला भोक पडत नाही असं माध्यमांना प्रत्युत्तर केले. सध्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील वाद कमी आणि महाविकास आघाडीमध्ये जास्त असे एकंदरीत चित्र असून महविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत वाद उफाळून येत असल्याचे अलीकडील काही प्रकरणांवरून दिसत आहे.
नुकतेच शरद पवारांच्या राजीनामा प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. त्यातच आता महाविकास आघाडीत सुरू असलेल्या या घमासानिमुळे राज्यातील कार्यकर्ते मात्र चांगलेच बुचकाळ्यात पडले असून निवडणुकीत महा विकास आघाडी एकत्र लढेल की नाही अशी शंका कार्यकर्ते खाजगीत उपस्थित करत आहेत.