मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमुळे आता विधानसभा बरखास्त होणार आणि पुढे नेमके काय होणार याबाबत मोठी चर्चा सुरु झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर हॅन्डलवरून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीना वेग, विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असे ट्वीट केल्याने शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन सत्ता पालट होणार की महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांची रननीती कामी येणार हे लवकरच समजणार आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जवळपास 35 ते 36 आमदार आहेत. त्यांनी गुजरातमधून या आमदारांना घेऊन थेट आसाम गाठले आहे. याबाबत संजय राऊत यांना माध्यमांनी विचारले असता, तेथे मोठ मोठी जंगले आहेत, निसर्गरम्य ठिकाण आहेत त्यामुळे ते फिरायला गेले असतील. आमदारांनी देश फिरायला पाहिजे म्हणजे त्यांना आपल्या देशाबद्दल अधिक माहिती मिळते असे खोचक उत्तर दिले आहे. आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे कट्टर समर्थक आहेत त्यामुळे ते आपल्या समर्थकांसह पुन्हा येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.