Sangli Murder | राष्ट्रवादी कार्यकर्ता ‛नालसाब’ खून प्रकरणात गुंड सचिन डोंगरे निघाला मुख्य सूत्रधार, पोलिसांनी धडक कारवाई करत तिघांना केली ‛अटक’

सुधीर गोखले

सांगली : सांगलीत राष्ट्रवादी चा कार्यकर्ता नालसाब मुल्ला (वय ४१ रा गुलाब कॉलनी)  यांच्या खुनाचा छडा सांगली पोलिसांनी काही तासातच लावला असून या खुनाचा कट कळंबा कारागृहात शिजल्याचे निष्पन्न झाले आहे. कळंबा कारागृहात सध्या जेलबंद असलेल्या जॉय ग्रुप चा प्रमुख सचिन डोंगरे याच्या सांगण्यावरून हा खून झाला झाला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

या प्रकरणाबाबत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेमध्ये या खुनाचा उलगडा केला असून काही तासातच मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. ‘राष्ट्रवादी’ चा कार्यकर्ता अशी ओळख असलेला नालसाब हा एक वादग्रस्त ग्रुप चा प्रमुख होता. एकेकाळचा नालसाब चा साथीदार असलेल्या सचिन डोंगरेंवर मोका अंतर्गत २०१९ मध्ये कारवाई झाली होती. या कारवाई मधून जामीन मिळवण्यासाठी नालसाब आपल्याला मदत करत नसल्याचा राग त्याच्या मनात होता. यातूनच गुंड सचिन याने  ने संशयित आरोपी सनी सुनील कुरणे (वय २३ जयसिंगपूर ता. शिरोळ) विशाल सुरेश कोळप (वय २० लिंबेवाडी ता. क.महांकाळ) आणि स्वप्नील संतोष मलमे (वय २० रा.खरशिंग ता.क.महांकाळ) आणि एक अल्पवयीन यांच्या करवी हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे तशी कबुली या तिघांनी दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली आहे. 

एक दिवस आधी रेकी … संशयित स्वप्नील मलमे सह चौघांनी एक दिवस आधी नालसाब च्या हालचालींची रेकी केली होती. मुल्ला कोठे बसतो कसे वागतो कोणाला भेटतो आदी गोष्टीची रेकी या चौघांनी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा काटा काढण्याचा कट रचला आणि त्याच्यावर गोळ्या झाडत तलवारीने वर्मी घाव घातले. 

पोलीस प्रशासनाचे मोठे यश.. खून झाल्या झाल्या काही तासातच मारेकरांच्या मुसक्या आवळल्या गेल्यामुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खुनाची घटना घडताच तातडीने पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास चक्रे वेगाने फिरली. पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, निरीक्षक सतीश शिंदे, संजय मोरे, सहा निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकाने हि कामगीरी पार पाडली.