Breaking News : पोस्ट टाकण्याच्या याचीकेवर हायकोर्टात वानखेडे यांना झटका तर नवाब मलिक यांना दिलासा!

मुंबई : मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात त्यांच्याविषयी व समीर वानखेडे यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास मनाई करावी असा जो अर्ज केला होता त्यास कोर्टने नकार दिला आहे. त्यामुळे एक प्रकारे नवाब मलिक यांचा हा विजय असल्याचे त्यांचे कार्यकर्ते मानत आहेत.

समीर वानखेडे यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई केल्यानंतर ही कारवाई आणि याच्या अगोदरच्या सर्व कारवाया ह्या फेक होत्या आणि त्या मुद्दाम ठरवून केल्या जात होत्या असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी चुकीच्या पद्धतीने sc सर्टिफिकेट मिळवून sc लोकांचा हक्क हिरावून घेतला असल्याचा आरोप करत अनेक बाबी सोशल मीडियावर जाहीर केल्या होत्या.

त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज सोमवारी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात पोस्ट टाकण्यास मनाई करण्यास नकार दिला. मात्र हा निर्णय देताना मलिकांनी माहितीची पडताळणी करावी असेही सांगितले आहे.

नवाब मलिक ट्विट करुन म्हणतात सत्यमेव जयते…