‛समीर वानखेडे’ यांच्या लग्नाचे ‛सर्टिफिकेट’ आणि ते ‛फोटो’ आले समोर, मुद्दा उघड करण्याचे कारण धर्म नव्हे तर फसवणूक : ‛नवाब मलिक’

मुंबई : आर्यन खान (aryan khan) ड्रग्ज (drugs) प्रकरणानंतर एनसीबी (ncb) अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) आणि मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्यातील वाद काही केल्या शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. समीर वानखेडे यांनी प्री प्लॅन ने बनावट ड्रग्ज प्रकरण घडवून आणून यात निर्दोष लोकांना गोवल्याचे नवाब मलिकांनी म्हटले होते त्यानंतर त्यांच्यात आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात मोठ्या प्रमाणावर द्वंद्व पेटल्याचे पाहायला मिळत आहे.
नवाब मलिक यांनी आज पुन्हा समीर वानखेडे यांचे पहिल्या लग्नातील ‛निकाहनामा’ चे (लग्नाचे) सर्टिफिकेट समोर आणले आहे ज्यामध्ये समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख दिसत आहे.

काहीजण समीर वानखेडे यांच्याबाबत मी जे पुरावे सादर करत आहे त्याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ काढण्याचा प्रयत्न करतील पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडेचा जो मुद्दा उघड करत आहे तो त्याच्या धर्माचा नाही तर ज्या फसव्या मार्गाने त्याने IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे ते मला समोर आणायचे आहे असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
असे म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांच्या पहिल्या लग्नाचा हा ‘निकाह नामा’ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे.

या निकाह नाम्यामध्ये मेहेरची रक्कम रु.33000 होती तर यातील 2 क्रमांकाची साक्ष ही समीर वानखेडेची मोठी बहीण यास्मिन वानखेडे पती अजिज खान याची होती असे मंत्री नवाब मलिक यांनी पुराव्यानिशी सादर केले आहे.