अब्बास शेख
केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील पंडिता रमाबाई मुक्तीमिशन येथे 3 अल्पवयीन मुली आणि एका सज्ञान मुलीचा विनय भंग करण्यात आला असून या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी भास्कर निरूगट्टी (वय 53 वर्षे संस्थेत finance manager) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
यवत पोलिसांनी आरोपीवर भादवि कलम 354(A) सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 10,12 सर अ.जा.ज.प्र.का.क.3(1)(w)(i),3(2)(va) या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत सर्वप्रथम सहकारनामा ने बातमी प्रसिद्ध करत या प्रकरणाला वाचा फोडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा घडला दिनांक 17/04/2024 रोजी 06:00 ते 06:30 च्या दरम्यान बोरीपार्धी (तालुका दौंड जिल्हा पुणे) येथील पंडिता रमाबाई मुक्ती संस्थेतील एलिम गार्डन येथे हा गुन्हा घडला होता. यात 3 अल्पवयीन मुली व एक सज्ञान मुलगी यांच्यासोबत हा वरील नराधम आरोपी हा विचित्र चाळे करून त्यांचा विनयभंग करत होता.
आरोपीला 4 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून अधिक तपास आण्णासाहेब घोलप (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग दौंड) हे करीत आहेत.