दौंड : हातवळण (ता.दौंड) येथील श्री हनुमान वि.वि.कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सागर नानासाहेब फडके तर व्हॉइस चेअरमनपदी संगीता किसन सकुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीवेळी सोसायटीचे सर्व संचालक तसेच आजी-माजी सदस्य, सचिव बापूराव रणदिवे, सरपंच योगेश फडके, माजी सरपंच अनिल गवळी, सुनील जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते. या यावेळी उपस्थित व्यक्तींच्या हस्ते नवनिर्वाचित उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
सागर फडके यांनी या अगोदर हातवळण गावचे सरपंचपद तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद भूषविले आहे. आज त्यांनी श्री हनुमान सोसायटीच्या चेअरमपदाचा पदभार स्वीकारला. सागर फडके हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक स्वर्गीय नानासाहेब फडके (माजी संचालक पुणे जिल्हा दूध संघ) यांचे चिरंजीव आहेत.
बिनविरोध झालेल्या निवडणूकीचे निर्णय अधिकारी म्हणून एस. एम. गव्हाणे यांनी कामकाज पाहिले.