Sad News | महाभारतातील ‘शकुनी’ हरपला, गुफी पेंटल यांचे निधन

मुंबई : 1980 च्या दशकामध्ये बीआर चोप्रा (B.R.Chopra) यांच्या ‘महाभारत’ (Mahabharat) या टीव्ही सिरियलमध्ये शकुनी (Shakuni) ची विशेष भूमिका साकारून ‘शकुनी’ या पात्राची भूमिका अजरामर करणारे अभिनेता गुफी पेंटल (Gufi Pental) यांचे आज सोमवारी निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते.

अभिनेता गुफि पेंटल हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. प्रथम त्यांना फरिदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते जेथे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आरोग्य समस्या आणि हृदयविकारामुळे त्यांचे आज सोमवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुफीच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.

अभिनेता गुफी पेंटलच्या मृत्यूचे कारण.. गुफी पेंटलचा पुतण्या हितेन पेंटल याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘दुर्दैवाने ते आता राहिले नाहीत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचे झोपेतच हृदय निकामी झाल्याने त्यांचे झोपेतच निधन झाले.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 मि. ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

13 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

15 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

17 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago