Categories: Previos News

Sad News : ‛राहू’ येथे नदीमध्ये गणपती विसर्जन करताना ‛युवक’ वाहून गेला, शोध कार्य सुरू…



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

आज गणपती विसर्जन असल्याने दौंड तालुक्यात सर्वत्रच उत्साहात आणि नियमांचे काटेकोर पालन करून गणेश विसर्जन केले गेले मात्र राहू गावमध्ये या उत्साहावर विरजण पडले असून राहू येथे भीमा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करायला गेलेला एक युवक मूर्ती विसर्जन करताना पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नदीत वाहून गेलेल्या युवकाचे नाव दुर्गेश पंडित असल्याचे ग्रामस्थांकडून माहिती मिळत असून तो  11 वीत शिकत होता. दुर्गेश हा गणेश मूर्ती विसर्जन करत असताना बुडत असल्याचे पाहून तेथील सर्प मित्राने वाहत्या पाण्यात उडी मारून त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा बहाव जास्त असल्याने त्याला त्यामध्ये यश आले नाही.

दुर्गेश पंडित यास शोधण्यासाठी राहू चे  ग्रामस्थ सध्या होडी आणि बोटीच्या साहाय्याने त्याचा शोध घेत आहेत मात्र अजूनही त्याचा शोध लागत नसल्याने त्याच्या परिवारासह ग्रामस्थही चिंतेत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago