दौंड : सहकारनामा ऑनलाईन
भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस राजाराम तांबे यांचे वडील मारूती महादेव तांबे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. दौंड तालुक्यातील पारगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
तांबे यांना ‛सहकारनामा’ परिवाराच्या वतीनेही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि हा आघात सहन करण्याची ताकद तांबे कुटुंबियांना मिळो अशी प्रार्थना करण्यात आली.