लग्न समारंभांसाठी 200 लोकांची परवानगी तर अंत्यसंस्कारासाठी असतील हे नियम

पुणे : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने आता राज्यसरकारनेही नियम शिथिल केले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १ फेब्रुवारीपासून सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे.

लग्नसमारंभासाठी आता 200 व्यक्तींपर्यंत मुभा देण्यात आली आहे तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. असे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून व्यापार आणि उद्योगधंद्यांवर याचा सकारात्मक परिणाम जाणवणार आहे.