दौंड : सहकारनामा ऑनलाइन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले गट) पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष( महिला आघाडी) पदी रेखा चव्हाण यांची व दौंड तालुका अध्यक्ष पदी शुभांगी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
शहरातील पक्षाच्या एका कार्यक्रमात RPI महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा जयश्री जाधव यांनी नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
RPI चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या तत्वांशी,विचारांशी एकनिष्ठ राहून पदाधिकाऱ्यांनी संघटन करावे, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्यरत रहावे असे जयश्री जाधव यांनी या वेळी नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पक्षाचे पदाधिकारी प्रकाश भालेराव,सतीश थोरात,रोहित कांबळे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.