केडगाव-बोरीपार्धी येथील BSNL कार्यालयात 70 हजारांच्या मुद्देमालाची चोरी

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्धी (ता. दौंड जि. पुणे) या गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बी.एस.एन.एल ऑफिस मधील डब्ल्यु. डी. आर आणि एक्सचेंज पावर स्पलायच्या बंद रूमचा कडीकोयंडा व कुलुप तोडुन चोरट्यांनी विविध गेजची सुमारे 70 हजार रूपये किमतीची कॉपर केबल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत येथील बी एस एन एल चे कार्यालईन अधिकारी अंकुरकुमार मनोहरभाई वर्मा यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी बी.एस.एन.एल ऑफिस मधील डब्ल्यु. डी. आर आणि एक्सचेंज पावर स्पलायच्या बंद रूमचा कडीकोयंडा व कुलुप तोडुन त्यावाटे आत प्रवेश केला आणि रूममधील पॉवर स्पलाईचे वेगवेगळया गेजचे ७० हजार रूपये किमतीच्या १२ कॉपर केबल घरफोडी चोरी करून चोरून नेली असल्याची फिर्यादित म्हटले आहे.

यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोना कापरे हे अधिक तपास करीत आहेत.