दौंड | अखेर ‘त्या’ निर्णयाने कोर्टात न जाता दौंडमधील शेतकऱ्यांना रस्ते खुले होऊ लागले 

अब्बास शेख

दौंड : मध्यंतरी राज्य शासनाने पानंद, शेतीतील अंतर्गत रस्ते खुले करण्याचा निर्णय घेतला अण याचा मोठा फायदा आता शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. दौंड तालुक्यातील असाच एक 2012 पासून तब्बल तेरा वर्षापासून अडवलेला रस्ता खुला करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

रावणगाव मंडल विभागातील नंदादेवी येथील शिव रस्ता 2012 पासून तब्बल तेरा वर्ष शेत बांधावरील शेतकऱ्यांच्या वादातून अडवला गेला होता तो मा. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला व तहसीलदार अरुण शेलार यांच्या पुढाकाराने खुला करण्यात आला.

यावेळी प्रत्यक्ष ठिकाणी महसूल नायब तहसीलदार तुषार बोरकर, मंडळ अधिकारी महेंद्रसिंग भोई ,ग्राम महसूल अधिकारी धनंजय डोंगरे ,भूमी अभिलेख चे भुकर मापक राऊत तसेच पोलीस विभागाचे अधिकारी पोलिस उप नीरीक्षक श्री कुंभार यांच्या उपस्थितीत तब्बल 1 किलोमीटर शिव रस्ता खुला करून देण्यात आला.

या रस्त्यामुळे आजूबाजूच्या 15 ते 20 शेतकऱ्यांना इतर शेती पिके ,ऊस यासारखे पिके ने आन करण्याकरता अडचणी येत होत्या त्याच्यातून आज मार्ग निघाला त्यामुळे संबंधित शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले.