Road Accident : कुरकुंभ जवळ कंटेनर आणि कारच्या अपघातात एकजण जागीच ठार तर चारजण जखमी



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील कुरकुंभ जवळ कंटेनर आणि स्विफ्ट डिझायर च्या अपघातामध्ये एक वृद्ध जागीच ठार झाले आहेत तर अन्य तीनजण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुरकुंभ जवळ महामार्गावर कंटेनर आणि  कारमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत 60 वर्षीय वृद्धांचा जागीच मृत्यू  झाला तर इतर चारजन जखमी झाले.

हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत असून मृत्युमुखी पडलेल्या वृद्धांचे नाव संजय कुमार असे आहे.

कुरकुंभ पोलिसांनी या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.