दौंड तालुक्यातील ८० गावांचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, असे आहे गाव निहाय आरक्षण

दौंड : दौंड तालुक्यातील ८० गावांचे गाव निहाय सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज दिनांक ०७/०७/२०२५ रोजी दौंड नविन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयामध्ये काढण्यात आली. यावेळी दौंडचे तहसीलदार अरुणकुमार शेलार यांनी खालील प्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण असल्याचे जाहीर केले आहे.

मागील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत असणाऱ्या अनेक भावी इच्छुक सरपंचांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.

या नव्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमुळे दौंड तालुक्यात आता पुन्हा एकदा गाव वाईज नवी राजकीय समीकरणे पहायला मिळणार आहेत.

पुढील काही महिन्यांमध्ये जिल्हापरिषद,पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण कश्या प्रकारे निवडणूक लढवतो यावर ग्रामपंचायतीच्या भावी इच्छुक सरपंचांचे निकाल ठरणार आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही.