वाखारी येथील फार्मसी कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दौंड (वाखारी) : भारत देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन दि.२६ जानेवारी २०२६ रोजी औषधनिर्माण महाविद्यालय श्री धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसी वाखारी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये संस्थेच्या सचिव सौ.राधिका परीक्षित शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ.संतोष वाघमारे सर यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थ्यांना देशभक्ती, समाज सेवा करण्याचे महत्त्व सांगितले व भारतीय लोकशाही, संविधान आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कर्तव्यांची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ति गाणी, नृत्य, नाटक आणि कविता वाचन करून प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वाला साजेसे वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत देशाच्या विविधतेत एकतेचा संदेश दिला.

या विशेष प्रसंगी संस्थेचे संचालक सौ.शोभाताई धनाजी शेळके, परीक्षित धनाजी शेळके तसेच विभाग प्रमुख प्रा.विकास गडधे व सर्व प्राध्यापक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपले सहकार्य देत राष्ट्रीय एकात्मतेचे आणि देशभक्तीचे महत्त्व सर्वांना पटवून दिले.