अख्तर काझी
दौंड : दौंड तालुक्यातील मलठण येथे एका 20 वर्षीय विवाहितेवर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून मलठण येथील नराधमावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा पीडित महिलेच्या पतीचा चुलत भाऊ असल्याने नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जून ते ऑक्टोबर 2021 दरम्यान पीडित महिलेचा चुलत दिराने पीडित फिर्यादी महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने याची वाच्यता कुठे केल्या फिर्यादीच्या पतीस जीवे मारण्याची धमकी देऊन, आपल्या मोबाईल मधील पीडितेचे फोटो व संभाषण सोशल मीडियावर सर्वत्र प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेला त्याने घरात व इतर ठिकाणी नेऊन शरीर संबंध प्रस्थापित केले. दौंड पोलिसांनी दि.22 ऑक्टोबर रोजी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सहा. पो. निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.