पत्नीसमोरच नराधमाने केला पीडीतेवर बलात्कार, आरोपीला अटक

अख्तर काझी

दौंड : पीडितेवर नराधमाने आपल्या पत्नी समोरच लैंगिक अत्याचार केल्याची अतिशय संताप जनक घटना दौंड मध्ये घडली. पीडितेच्या तक्रारीवरून दौंड पोलिसांनी नराधमा विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(1) अन्वये गुन्हा दाखल करीत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. जमीर खान(रा. पानसरे वस्ती ,दौंड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना जानेवारी 2025 ते 3 ऑगस्ट 2025 दरम्यान घडली. आरोपी जमीर याने पिडितेशी मैत्री केल्याचे नाटक केले. काहीतरी बोलायचे आहे असे सांगून तिला कुरकुंभ -पाटस रोडवरील एका लॉज मध्ये नेऊन त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पिडीतेने ओरडण्याचा व विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिचे तोंड दाबले आणि मोबाईल मध्ये तिचे फोटो काढले.

दि. 31 जुलै 2025 रोजी लग्न करण्यासाठी म्हणून आळंदी येथे घेऊन गेला आणि तेथून बारामती येथे नेले. या ठिकाणी पुन्हा पीडितेच्या इच्छेविरुद्ध त्याच्या पत्नीसमोरच शारीरिक संबंध ठेवले. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.
शहरातील एका व्यापाऱ्याने आपल्या दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाच त्याच स्वरूपाची घटना पुन्हा घडल्याने शहरात संतापाचे वातावरण आहे.