Categories: राजकीय

अखेर निवडणूक निकाल जाहीर..महाविकास आघाडीला झटका, मते फुटल्याने भाजप ची खेळी यशस्वी!

सहकारनामा

मुंबई : राज्यासभा निवडणूक निकाल नाट्यावर अखेर पडदा पडला असून या निकालात महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास 9 मते फुटली असल्याचे समोर आले आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. मात्र यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि निकाल लांबणीवर पडला. त्यामुळे या निवडणुकीसाठी असलेली चूरस आणि जनतेची उत्सुकता खूपच तानली गेली. या निवडणुकीत 285 आमदारांनी मतदान केले. रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंडे हे विजयी झाले. तर 6व्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाल्याने शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.

असा आहे निकाल..
संजय राऊत – 41
पीयूष गोयल – 48
अनिल बोंडे – 48
प्रफुल्ल पटेल – 43
इम्रान प्रतापगढी 44
धनंजय महाडिक – 41
संजय पवार – 33

या निवडणुकीत शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत झाला असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीला यश येऊन भाजपला महाविकास आघाडीची 9 मते मिळवण्यात यश आले आहे.
123 इतके भाजपचे संख्याबळ झाले असताना राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत होती. मात्र, पीयूष गोयल यांना 48 मते आणि अनिल बोंडे यांनाही 48 मते मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मते ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे. तर धनंजय महाडिक यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मते मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची 9 मते फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. धनंजय महाडिक हे 41 मते घेऊन विजयी झाले आहे. तर संजय पवार यांना 33 मते मिळाली आहे.
आमदारांना फोडण्यात भाजपला यश
महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या 106 मतांशिवाय त्यांना अधिकची मतं 17 मिळवण्यात यश आलं आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago