भीमा-पाटस कारखाना सुरू करणारच, आमच्यावर आरोप करणारे किती खरे बोलतात हे त्यांच्या कार्यकर्त्यांनीच सांगितले : राहुल कुल यांची रमेश थोरात यांचे नाव न घेता टीका

दौंड : भीमा पाटस कारखाना कुठल्याही परिस्थिती सुरू करणारच असा विश्वास दौनेचे आमदार आणि भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी व्यक्त केला आहे. याचवेळी कारखान्याबाबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर दिशाभूल करून वाट्टेल ते आरोप करायचे हे जास्त दिवस चालत नाही, आज ना उद्या सत्य समोर येत असते. आमच्यावर आरोप आणि टीका करणाऱ्यांची सत्य परिस्थिती त्यांच्याच कार्यकर्त्यांनी (सहकारनामा) वृत्तपत्रांमधून मांडली आहे असा टोला दौंडचे आमदार राहुल कुल यांनी माजी आमदार रमेश थोरात यांचे नाव न घेता लगावला आहे. यावेळी त्यांनी इंदापूर आणि दौंडच्या पाणी प्रश्नावरून काही लोकांनी आत्तापर्यंत फक्त लोकांची दिशाभूल केल्याचेही नमूद केले.

भांडगाव ग्रामविकास प्रतिष्ठाण ने आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या परिस्थितीवर बेछूट आरोप करणाऱ्यांवर त्यांनी टीका करताना ज्यांच्या कार्यकर्त्यांनी ते किती खरे बोलतात हे थेट पत्रकारपरिषद घेऊन जाहीर केले ते आमच्यावर टीका, टिप्पणी करतात. पण मी जे काम करतो ते मला, माझट कार्यकर्त्यांना आणि जनतेला माहीत आहे, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही अधिक बोलण्याची गरज राहिलेली नसावी असे मला वाटते असा टोला मारून त्यांनी कारखाना हा कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरू करणारच असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी देशाचे गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्समधून सूट दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.