दौंड मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

अख्तर काझी

दौंड शहर : दौंड मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले मा. नगराध्यक्ष योगेश कटारिया ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी शिनोलीकर, मराठा महासंघाचे नाना जगताप, बाळासाहेब तोंडेपाटील ,मोहन पडवळकर ,जीवराज पवार, नागेश बेलूरकर, विशाल माशाळकर ,वसीम शेख आदी मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये अहिल्यादेवी यांच्या महानकार्याचा आढावा घेतला व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.