अब्बास शेख
पुणे : पुणे जिल्ह्यात 17 ऑक्टोबर सायंकाळपासून ते 18 ऑक्टोबर सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध भागात मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद ही दौंड, पुरंदर आणि पुणे शहरात नोंदविण्यात आली असून या नुकसानीची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
सर्वाधिक पाऊस झालेले तालुके आणि त्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे :-
पुणे शहर : 76.00
दौंड : 75.88
पुरंदर : 75.29
बारामती : 59.75
आंबेगाव : 49.40
शिरूर : 40.89
भोर : 35.00
हवेली : 33.50
जुन्नर : 30.89
इंदापूर : 25.76
मावळ : 22.86
मुळशी : 12.67
वेल्हा : 5.75
अश्या सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
तर या अतिवृष्टीमुळे झालेले प्राथमिक नुकसान पुढील प्रमाणे आहे :
1. मयत व्यक्ती संख्या : 2
- स्थलांतरित कुटुंब : 118 ( 521 व्यक्ती)
- स्थलांतरित पशुधन : 161
- घरात पाणी शिरले : 30 घरे
- घरांची पडझड:- A) पुर्णत : 1 घर
- मयत पशुधन : 7 शेतीपिकांचे नुकसान : 251.21 हेक्टर / आर
A) लहान / मोठी : 19
B) अंशत: कच्ची घरे 85
B) कोंबड्या : 40
अशी नुकसान झालेली प्राथमिक माहिती असून यात वाढ होऊ शकते.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन टीम, पोलिस, अग्निशमन टीम, होमगार्ड इत्यादी अलर्ट आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी तहसिलदार, कृषि अधिकारी व इतर संबंधित अधिकारी समक्ष पाहणी करत आहेत. तसेच मयत व्यक्ति, जखमी व्यक्ति, घरांची पडझड, मयत पशुधन, सार्वजनिक /खाजगी मालमत्तेचे नुकसान व शेतीपिक/फळपिक इत्यादी नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही स्थानिक पातळीवर सुरू करण्यात आली आहे. वरील प्रमाणे दिनांक 17 ऑक्टोबर 2022 व दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी अखेर झालेल्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल असून याबाबत सविस्तर अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.