स्व.रखमाबाई ताडगे प्रतिष्ठानच्या 15 व्या दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : स्व.रखमाबाई ताडगे प्रतिष्ठान तर्फे पंधराव्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दरवर्षी स्व.रखमाबाई ताडगे प्रतिष्ठानतर्फे दोन हजार कॅलेंडरचे मोफत वाटप केले जाते. यामध्ये प्रतिष्ठाणने वर्षभर केलेल्या सामाजिक उपक्रमाच्या माहितीचा समावेश केला जातो. यावर्षी प्रतिष्ठानतर्फे सिध्दीविनायक गणपती ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विध्यमाने इयत्ता अकरावी आर्ट आणि सायन्स ची पुस्तके वरवंड केडगाव खुटबाव आणी धनकवडी येथील विद्यालयास भेट देण्यात आली .
कॅलेंडरचे प्रकाशन करताना पुणे शहराचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ.वैशालीताई नागवडे, दौंड तालुक्याचे जेष्ठ नेते अशोक खळदकर, प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल उर्फ बंडु ताडगे व संचालक शांताराम मनवरे, राहुल दुर्गे, मुकेश यादव आदी उपस्थित होते.