‛खाकि’तील माणुसकी आली समोर, हे PSI ठरत आहे रोल मॉडेल



लोणीकळभोर : सहकारनामा ऑनलाईन (महेश फलटणकर)

– जेव्हा कोणी नसते तेव्हा पोलीस मदतीला धावून येतात असा अनुभव आता या लॉकडाऊनच्या काळात  येत असून पोलीसातील लपलेला देव माणुस अन्नदाता म्हणून पुढे येत आहे.

कोरोनाच्या आजारामुले संचारबंदी लागु होउन बाजारपेठा, उद्योगधंदे बंद पडल्याने कामगार, मजुर शेकडो कुटंबीयांची मोठी गैरसोय होत आहे. कदम वाकवस्ती परिसरात मोलमजुरी ,रोजंधारीने काम करणारे, हातवर पोट असणारे तसेच फेरीवाले अश्या वंचित घटकांवर लाॅकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी लोणी स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवर शिवभोजन थाळी सुरु करुन गोरगरिबांच्या जेवणांची नियोजन केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी पोलीसातील माणुसकी दाखवत कोरोना पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्याने लोणी स्टेशन परिसरातील गोरगरीब जनतेच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला असल्याने त्यांना मदत म्हणून  नुकत्याच सुरू झालेल्या शिवभोजन थाळीला भेट देऊन परिसरातील ५०० लोकांच्या जेवणाचा खर्च उचलुन निराधराचे आधारवड झाले आहेत. पोलीस असल्याची जबाबदारी पार पाडता पाडता ते सामाजिक कार्य करत असल्याने समाजाच्या सर्व थरातून त्यांच्या कामाचे कौतुक  होत आहे. तसेच समाजातील इतर लोकांनी पुढे येऊन शिवभोजन थाळीला हातभार लावावा असे आवाहन ननवरे यांनी केले आहे.