Pride : शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील चौफुला येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर यांच्याकडून  तालुक्यातील विविध मान्यवर पत्रकारांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

सहकारनामा चे संपादक तसेच दैनिक केसरीचे तालुका प्रतिनिधी अब्बास शेख यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी सर्व पत्रकार बांधवांना दिवाळी फराळ आणि मिठाई भेट देण्यात आली.

यावेळी महेश पासलकर यांनी बोलताना संपूर्ण भारत एकजूट होऊन कोरोना या महामारीशी लढत आहे. अशा कठीण परिस्थितीत आपण पत्रकार मंडळी समाज आणि समाजातील लोकांसाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनीय आहे. आपल्या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक नवीन उदाहरण ठेवले आहे. आपल्या धैर्याला आम्ही सलाम करतो असा गुणगौरव आपल्या भाषणातून केला.

तालुक्यातील विविध पत्रकारांनी कोरोना काळात केलेल्या  अतुलनीय कामगिरी बाबत त्यांना शिवसेना दौंड विधानसभा व शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर मित्र परिवाराच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.