Categories: Previos News

Political – भांडगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात पॅनेल प्रमुख थोडक्यात अपयश, मात्र ‛इतक्या’ जागा बिनविरोध झाल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते खुश

दौंड : सहकारनामा 

दौंड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असणारी भांडगावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात दोन्ही पॅनल प्रमुखांना अखेर अपयश आले आहे. मात्र 11 जागांपैकी  8 जागा बिनविरोध करण्यात त्यांना यश आले असल्याने आता फक्त 3 जागेसाठी हि निवडणूक होणार आहे. 

बिनविरोध झालेल्या 8 जागांमध्ये कुल यांचे समर्थक काटकर दादा आणि थोरात यांचे समर्थक मधूअण्णा दोरगे यांचे प्रत्येकी 4-4 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

निवडणूक लागलेल्यामध्ये 1 नंबर वार्ड मध्ये एका जागेसाठी, 3 नंबर वार्डमध्ये एक जागेसाठी तर 4 नंबर वार्डमध्ये एक जागेसाठी तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये भाजपचे रवी दोरगे, राष्ट्रवादीचे संतोष मधुकर दोरगे आणि अपक्ष रामदास दोरगे यांच्यामध्ये ही तिरंगी लढत होणार आहे.

ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी तालुका पातळीवरील दोन्ही नेत्यांनी ताकद लावली होती. तर आमदार राहुल कुल यांनीही गावच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी दोन पावले मागे येऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

24 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago