Political | केडगाव ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर, गाव पुढाऱ्यांची व्यूह रचना त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता

अब्बास शेख

दौंड | दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नाव लौकिक मिळविलेल्या केडगाव गावच्या ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. आज दुपारी आरक्षण सोडत निघाल्यानंतर अनेक इच्छूकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे आता आहे हेच आरक्षण राहणार की कुणी हरकती नोंदविणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. १४ जुलै पर्यंत हरकती आणि त्यानंतर वार्ड प्रमाणे याद्या तयार करण्यात येणार आहेत.

आज केडगाव ग्रामपंचायतीच्या ६ वार्डचे आरक्षण जाहीर झाले असून त्यामध्ये खालील प्रमाणे आरक्षण आणि सदस्य संख्या असणार आहे.

वार्ड क्र.१) देशमुखमळा- ३ जागा
१ ओपन पुरुष
१ ओबिसी पुरुष
१ मागासवर्गीय महीला

वार्ड क्र.२) पा.निंबाळकर वस्ती- ३ जागा
१ ओपन पुरुष
१ ओपन पुरुष
१ ओपन महीला

वार्ड क्र.३) हंडाळवाडी- २ जागा
१ ओपन महीला
१ मागासवर्गीय पुरुष

वार्ड क्र.४) धुमळीचामळा- ३ जागा
१ ओपन पुरुष
१ ओपन महिला
१ ओबिसी महिला

वार्ड क्र.५) केडगाव स्टेशन- ३ जागा
१ ओबिसी पुरुष
१ ओपन महिला
१ ओपन महिला

वार्ड क्र.६) केडगाव गावठान ३ जागा
१ ओबीसी महीला
१ ओपन महीला
१ ओपन पुरुष

वरील वार्ड वाईज जाहीर झालेले आरक्षण पाहता अनेक ठिकाणी इच्छूकांच्या आशेवर पाणी फिरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधकांच्या अगोदर स्वतःच्या गटातील बंडाळी मोडून काढण्याचे आव्हान गाव पुढाऱ्यांसमोर उभे राहणार आहे. अनेकांना सदस्य पदाचे आमिष दाखविणारे गाव पुढारी आपल्याच जाळ्यात फसतात की काय अशी परिस्थिती सध्याच्या आरक्षण सोडतीनंतर पहायला मिळत असून याबाबत लवकरच सविस्तर वृत्त दिले जाईल.