Political – दौंड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विलास शितोळे यांची निवड



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विलास पांडुरंग शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

वसीम इस्माईल शेख यांनी बुधवार (दि.२) उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी यांच्याकडे दिला होता. राजीनामा मंजुरीनंतर हे पद रिक्त झाले होते. उपनगराध्यक्ष पदासाठी बुधवार (दि.१६) निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये विलास शितोळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष रमेश थोरात व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, अॅड अजित बलदोटा, यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विलास शितोळे यांचा सत्कार केला. 

यावेळी गटनेते तथा नगरसेवक बादशहा शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. दौंड नगरपालिकेतील 24 नगरसेवकांपैकी चौदा नगरसेवक राष्ट्रवादी शिवसेना युतीचे असल्याने उपनगराध्यक्षपदी युतीचाच उमेदवार निवडून येणार हे सिद्ध होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस नेमक्या कोणाला ही संधी देणार याची सर्वांना उत्सुकता होती.

आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष मराठा किंवा मागासवर्गीय नगरसेवकाला संधी देतील असे भाकीत राजकीय वर्तुळात होते ते खरे ठरले.