तुषार हगारे
भिगवण : ठाणे पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणारे डिकसळ (ता.इंदापूर) गावचे सुपुत्र महेश मोरे (वय,२७) हे पोलीस दलात कार्यरत असताना आकस्मिक मृत्यू झालयाने डिकसळ गावावर शोककळा पसरली असून महेशच्या अचानक जाण्याने पोलीस दलासह गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
ठाणे पोलीस दलातील शीघ्र कृती दलात कार्यरत असताना दररोज सकाळी व्यायामासाठी जवान जात असतात, गुरुवारी सकाळी ६ वाजता ठाणे येथील साकेत मैदानावर शिपाई महेश मोरे आणि अन्य सहकाऱ्यासोबत व्यायाम करण्यासाठी गेले होते याच वेळी व्यायाम करतेवेळी मोरे जमिनीवर कोसळले त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मोरे यांचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला हे स्पष्ट होईल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मोरे यांच्या डिकसळ गावी गुरुवारी सायंकाळी ८ वाजता शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थानसह मित्र परिवारकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मोरे यांच्या पत्नी ठाणे वाहतूक विभागात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे तर भाऊ सांगली पोलीस दलात असून त्यांच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.