Categories: क्राईम

‘या’ कारणामुळे पोलीस हवालदार सुनील शिंदेंनी केली ‘आत्महत्या’!

पुणे : शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुनील नारायण शिंदे (वय 50 वर्ष पोलीस हवलदार, नेमणूक शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे) यांच्या आत्महत्येबाबत आता पोलिसांनी खुलासा केला आहे. त्यांच्यावर भादवी 306 नुसार गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा कयास पोलिसांनी चौकशीअंती लावला आहे.

सुनील शिंदे यांनी गणराज पार्क, कवडी माळवाडी कदम वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आज रोजी 02.00. ते 10.00 दरम्यान त्यांच्या राहते घरी सिलिंग फॅनला पडद्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

याबाबत त्यांच्या कुटुंबियाकडे प्राथमिक चौकशी करता त्यांच्यावरती व कुटुंबीयांवरती त्यांच्या सुनेने आत्महत्या केल्यामुळे हडपसर पोलीस स्टेशन येथे भा द वि कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल असून दाखल गुन्ह्यामध्ये काल दिनांक 27/07/2022 रोजी न्यायालयामध्ये तारीख होती. त्या मध्ये मनाप्रमाणे चार्ज फ्रेम झाला नव्हता म्हणून त्याचे टेन्शन घेऊन त्यांनी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना कुटुंबाकडून मिळाली आहे. सदर घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळून आली नाही.

लोणी काळभोर पोलिसांनी मयताचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्यांची बॉडी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके, लोणी काळभोर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago