|सहकारनामा|
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त सुहास दिवसे यांना (PMRDA) पी.एम.आर.डी.ए च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये ज्या त्रुटी आढळून येत आहेत त्याबाबत त्यांनी आयुक्तांकडे काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.
वैशाली नागवडे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये, पी.एम.आर.डी.ए.ने नुकताच जो विकास आराखडा प्रसिध्द केलेला आहे. त्यामध्ये दौंड तालुक्यातील ५१ गावांचा समावेश असून या आराखड्यावरील हरकती व सूचना दि.३० ऑगस्ट पर्यंत
द्यावयाच्या आहेत मात्र सदरील आराखड्यासंदर्भातील माहिती तांत्रिक कारणास्तव स्थानिक ग्रामस्थांना
समजण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यामुळे खालील मागण्यांचा विचार करून त्या प्रमाणे आदेश होण्याची विनंती करण्यात आली आहे.
१) दौंड तालुक्यातील पी.एम.आर.डी.ए. मध्ये ५१ गावांचा समाविष्ट असलेल्या गावांची एकत्रित बैठक आपल्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात यावी. जेणेकरून या गावातील ग्रामस्थांना विकास आराखडा समजून सांगुन बैठकीमध्ये गावांच्या अडी-अडचणी व विकास आराखड्याबद्दल चर्चा होऊ शकेल.
२) हरकती व सुचना नोंदवायची मुदत ही दि.३० ऑगस्ट पर्यंत आहे. परंतु अद्यापही ग्रामपंचायतींना किंवा वैयक्तिक नकाशे प्राप्त व्हायला अडचणी आहेत. तरी मुदत ही दि.३० सप्टेंबर पर्यंत करावी.
3) पी.एम.आर.डी.ए. हे प्रामुख्याने नियोजन प्राधिकरण म्हणून ग्रामपंचायत क्षेत्रात (ग्रामीण भागात) काम
करीत आहेत. परंतु पुणे महानगर नियोजन समिती खुप कमी प्रतिनिधीत्व (७ सदस्य) दिलेले आहे. तरी ग्रामीण
भागाला प्रतिनिधीत्व वाढवून मिळावे. कारण डेव्हलपमेंट प्लॅन हा पूर्ण ग्रामीण भागासाठी असताना त्यावर नागरी भागाचे वर्चस्व (२३ सदस्य) आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे.
४) पी.एम.आर.डी.ए. मध्ये येणाऱ्या मोठ्या गावांच्यामध्ये गावठानाच्या क्षमते इतक्याच वाड्या-वस्त्या असून त्यांना महसूली गावाचा दर्जा देण्यात येण्याबत विचार होऊन तिथे आर झोन व्हावा.
आपणाकडून सहकार्य व्हावे व बैठकीचे आयोजन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना
द्याव्यात अशी विनंती शेवटी वैशाली नागवडे यांनी आयुक्तांना केली आहे.