‘लॉकडाऊन’मुळे दिलगीर आहे पण ही काळाची गरज, ‛मन की बात’ मध्ये PM नरेंद्र मोदी



: सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाचा प्रादुर्भाव चिनमधून सुरू होऊन जवळपास संपूर्ण जगामध्ये पसरत चालला आहे.  याचा फटका आपल्या देशालाही बसला आहे त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये त्यामुळे देशात लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयाची घोषणा करण्यात येऊन त्याची अमंलबजावणी सुरू झाली आहे. देशातील जनतेचा या महामारीपासून  जीव वाचविण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल देशाची माफी मागतो असे ट्विट  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.



अनेक गरीब लोक जे रोजंदारीवर काम करतात, ज्यांना दररोज काम केले तरच त्यांचे पोट भरते असे लोक यावेळी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत असून यामध्ये कामगार, छोटे व्यावसायिक आणि कष्टकरी लोकांचा समावेश आहे या सर्वांची आणि देशवासीयांची मी माफी मागतो असेही पुढे मोदींनी म्हटले आहे. मन की बात द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधताना लॉकडाउनचे नियम पाळून तुम्ही इतरांची मदत करत नसून स्वतःचीच मदत करत आहात हे लक्षात ठेवा असे म्हणत तुम्ही जमावाने बाहेर निघून एक दुसऱ्याला करोना संसर्गबाधित होऊ नये म्हणून आपण ही काळजी घेत आहोत. जे लॉकडाउनचा नियम पाळणार नाहीत त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते असेही मोदींनी शेवटी सांगितले आहे.