| सहकारनामा |
नवी दिल्ली : काल कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेताना कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबाबत बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गहिवरून आले आणि त्यांनी लाईव्ह मिटिंगमध्येच अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
मात्र आता त्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंवरून मोठे राजकारण सुरू झाले असून एक महिन्यापूर्वी एका खासदारांनी थोडे दिवस थांबा मोदी टीव्हीवर येऊन गहिवरतील आणि त्यांना रडू कोसळेल अशी भविष्यवाणी केली होती. त्यांचा दि. 17 एप्रिल रोजीचा भविष्यवाणीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
ही भविष्यवाणी केली होती आप चे खासदार संजय सिंग यांनी. त्यांनी 17 एप्रिल रोजी आपल्या मुलाखतीमध्ये कोरोनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत बोलताना ‛अजून काही दिवस वाट पहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील आणि टीव्हीवर रडतील’ त्याचवेळी सर्व देशातील मीडिया देशाचे पंतप्रधान कशापद्धतीने भावूक झाले आणि रडू लागले याबाबत मोठ्या प्रमाणावर बातम्या देत राहतील असे म्हणाले होते.
काल जो पंतप्रधान मोदींना लाईव्ह बैठकीमध्ये अश्रू अनावर झाल्यानंतर आप चे खासदार संजय सिंग यांनी ट्विट करत 【‛17 अप्रैल को बोला था वो 21 मई को सच हो गया। देश को एक संवेदनशील नेक दिल इंसान चाहिये ढोंगी प्रधानमंत्री नही जो खुद रैली करके कोरोना फैलाए और बाद में रोने का नाटक करे।】असे म्हटले आहे.
पहा या ट्विटमधील व्हिडीओ..
जो 17 अप्रेल को बोला था, वो 21 मई को सच हो गया – संजय सिंग
त्यांचा मागील महिन्यातील व्हिडीओ आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झालेला व्हिडीओ त्यांनी शेअर केला असून अनेक वृत्तपत्रांच्या ऑनलाइन न्यूज पोर्टलनी त्यांचे ट्विट चा हवाला देत हि बातमी चालवली आहे.