Patas Crime | पाटस येथील 45 लाखांचे फर्निचर दुकान जाळून चोरी करणारा ‛नसरुद्दीन’ यवत पोलिसांच्या ताब्यात, 6 गुन्हे उघडकीस

पुणे | यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या पाटस येथे फर्निचरचे दुकान जाळून शेजारच्या दुकानातील साहित्य चोरणाऱ्या अट्टल चोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या संपूर्ण घटनेत आरोपींनी फिर्यादीचे दुकानाशेजारील दुकानातुन पत्रा कापून तांब्याच्या तारांची चोरी करून फिर्यादी यांच्या फर्निचरचे दुकानाला आग लावुन तब्बल ४५ रुपयांचे नुकसान केले होते.

सदरचा गुन्हा उघड आणण्यासाठी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अविनाश शिळीमकर यांना सुचना दिल्या होत्या.
सदर गुन्हयाचे घटनास्थळी मिळालेले पुरावे व गोपनीय माहीतीच्या आधारे पोनि अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते.
सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्ह्यातील आरोपी नसरूद्दीन
हिरामण भोसले (रा. कोराळे, ता. बारामती, जि. पुणे) हा केडगाव चौफुला येथील
पुलाखाली येवुन थांबला आहे अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली.

खात्री करण्यासाठी पथक सरकारी वाहनाने त्याठिकाणी गेले असता, केडगाव/चौफुला येथे पुलाखाली बजाज पल्सर मोटारसायकल क एम.एच ४२ बी. जी ८८५१ ही उभी करून दोन इसम एकमेकांशी बोलत असताना दिसुन आले. पोलीस पथकाने त्यांच्या जवळ जावुन त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) चीच्या उर्फ नसरुद्दीन हीरामण भोसले (वय २२ वर्षे, रा. कोराळे, ता. बारामती जि. पुणे) व २) कुलमुख उर्फ कामदेव शिवाजी काळे (वय २० वर्षे रा.
चितेगांव पठाणखेडा, जि. औरंगाबाद मुळ रा. वायरलेसफाटा गिरीम, तादौड, जि पुणे)
अशी सांगितली. सदर गुन्ह्याबाबत त्यांकडे विचारपुस केली असता ते दोघे उडवाउडवीची उत्तरे देउ लागले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा दोघांनी मिळुन केल्याचे सांगुन गुन्हयातील चोरलेला माल औरंगाबाद
या ठिकाणी भंगार व्यवसायिक यांना विकल्याचे सांगीतले.

सदर इसमांकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी दौंड, यवत, बारामती तालुका, वडगाव निबांळकर व नगर जिल्हा परीसरात दुकानाचे पत्रे कापुन आतमध्ये प्रवेश करून तांब्याचे तारा, वायर, मोटार इत्यादी साहीत्य चोरी करून औरंगाबाद व दौंड येथील भंगार व्यवसायिकांना चोरीचा माल विक्री केल्याबाबत सांगीतले. त्याबाबत
संबंधीत पोलीस स्टेशनकडे खात्री केली असता त्यांच्यावर दौंड, यवत, वडगाव निंबाळकर, बारामती, कर्जत याठिकाणी सहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. आरोपी १) चीच्या उर्फ नसरुद्दीन हिरामण भोसले व २) कुलमुख उर्फ कामदेव शिवाजी काळे यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कामगिरी ही अंकित गोयल (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण) आनंद भोईटे (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग) स्वप्नील
जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, सपोनि / राहुल
गावडे, सपोनि / महादेव शेलार, सहाफौ/ बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, पो.
हवा/ सचिन घाडगे, अजय घुले, असिफ शेख, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, चासफौ/मुकुंद कदम यांनी केली आहे.