पंचायत समिती ‘सभापती’ पदाकरिता उद्या आरक्षण सोडत, ‘सभापती’ पदाचे आरक्षण इतकी वर्षे असणार

पुणे : जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु असून नुकतीच जिल्हापरिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली असून आता पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत उद्या काढण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत उद्या ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार असल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.