इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत दौंड मधील शिशुविकास विद्या मंदिर शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत संपूर्ण देशभरात इंडियन स्वच्छता लीग हा कार्यक्रम राबविला जात असून त्या माध्यमातून विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दौंड मधील शिशूविकास विद्यामंदिर शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण पूरक गणेशोत्सव ,माझी वसुंधरा अभियान, जल प्रदूषण अशा विविध विषयांवर आधारित चित्रे काढून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडून चांगले चित्र काढले जावे यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी गणेश ओहोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिशुविकास विद्या मंदिराचे सचिव कृष्णा गावडे, अशोक पानसरे, रेखा पाटील, सुस्मिता पगी,पी. बी. अनंतकवळस, सुवर्णा साळुंखे, नीता निर्मल, वनिता तांबे, वृषाली सपकळ, वर्षा कुलकर्णी तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.संतोष टेंगले यांचे मार्गदर्शन लाभले.