राहुल अवचर
देऊळगावराजे : वडगावदरेकर (तालुका दौंड) येथील पुणे जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला होता
आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून विक्रीसाठी आणले होते. स्टॉलची मांडणी विविध पदार्थ व भाजीपाला फळभाज्या फळे यांचा बाल बाजारात अत्यंत आकर्षक पद्धतीने शालेय मैदानात भरवण्यात आला होता.
वडगाव दरेकर येथील मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील आलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करून विरंगळा मिळावा व त्यांच्यातील अंगकृती सुप्त कलागुणांना वाव देण्यात यावा तसेच मुलांना या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र लोणकर यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सारिका पोळ उपसरपंच छाया कापसे शाळा समितीचे अध्यक्ष गणेश शेजाळ सचिन नागवे शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले