अब्बास शेख
दौंड : आज सोमवार दि १२ ॲागस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत भटके, विमुक्त, आदिवासी, पारधी व इतर वंचित घटकांसाठी महसूल विषयक विविध योजनांसाठी दौंड तालुक्यातील बोरमलनाथ मंदिर, बोरिपार्धी व मल्लिनाथ मठ, स्वामी चिंचोली येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दौंड तहसीलदार अरुणकुमार शेलार साहेब यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेने समाजातील सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान केले आहेत. भटके, विमुक्त, आदिवासी, पारधी, व इतर वंचित घटकांतील नागरिकांचे हक्क अबाधित राखने, त्यांचे रक्षण करणे, त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी शासन कायम प्रयत्नशील असते. या समाजाच्या प्रगतीकरीता शासनाने त्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, शिष्यवृत्ती आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आज या सर्व योजनांच्या माहिती व लाभासाठी या कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय योजना, न्यूक्लियस बजेट योजना, ठक्करबप्पा आदिवासी वस्तीसुधार योजना, प्रधानमंत्री आदि आदर्श योजना, शबरी घरकुल योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना आदी विविध योजना राबविण्यात येत आहे. तसेच रस्ते, वीज, पाणी, विद्युत योजना अशा पायाभूत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येत आहे.