शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

राहुल अवचर

देऊळगाव राजे : देऊळगावराजे इंस्पायर्ड विंग्स एज्युकेशनल या संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रथमच दौंड तालुक्यातील शिक्षकांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संस्थेच्या 9890169724 या व्हाट्सअप क्रमांकवर आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ही स्पर्धा दिनांक 9 सप्टेंबर रोजी दौंड येथील पंचायत समिती सभागृह येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वैशाली नागवडे यांनी दिली. या स्पर्धेत दोन गट करण्यात आले असून यामध्ये प्राथमिक शिक्षक गट आणि माध्यमिक शिक्षक गट तसेच यात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक असे निवडले जाणार आहेत या स्पर्धेमध्ये समाजातील वेगवेगळे विषय घेण्यात आले आहेत या स्पर्धेचे उद्घाटन अजिंक्य येळे यांच्या हस्ते होणार आहे.

या स्पर्धेमध्ये शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे आव्हान संस्थेचे सचिव प्रशांत गिरमकर यांनी केली आहे. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, खजिनदार मधुबाला जगदाळे, वर्षा राणी गायकवाड, सुदर्शन गिरमकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.