अखेर सत्य समोर येऊ लागलं | निवृत्त कामगार आंदोलनाच्या आडून फक्त राजकारण सुरु ! हे आंदोलन फक्त ‘राहुल कुल’ यांना बदनाम करण्यासाठी असल्याने आंदोलनातून माघार – भीमा पाटस कर्मचारी

पाटस : दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखान्यावर सुरु असलेल्या निवृत्त कामगारांच्या आंदोलनाला राजकीय झालर असल्याचे आता खुद्द भीमा पाटसचे माजी कामगारच सांगत असून केवळ राजकीय फायदा उचलण्यासाठी होत असलेल्या या आंदोलनातून आता आपण माघार घेत असल्याचे माजी कामगार रवींद्र बोत्रे यांनी जाहीर केले आहे. या कामगाराने पत्रकारांना याची माहिती देऊन सोशल मीडियावर याबाबत पोस्ट सुद्धा केली आहे.

माजी कामगार रवींद्र बोत्रे यांनी माहिती देताना, मी एक भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा राजीनामा दिलेला कामगार आहे. गेल्या महिन्यापासून कारखाना स्थळावर कारखान्यातील सेवा निवृत्त कामगारांचे चक्री उपोषण चालू आहे. कामगारांची देणी थकली आहेत ही वस्तूस्थिती आहे. ते कारखान्याने दिलेच पाहिजे. त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणे काहीच गैर नाही पण 28/9/2024 ला भिमा पाटस कारखान्याची जनरल मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये माननीय चेअरमन साहेबांनी सेवानिवृत्ती कामगारांचे देणे पंधरा दिवसात दिले जातील असे सर्व तालुक्यातील नेतेमंडळी समोर व सर्व सभासदांच्या समोर आश्वासन दिले होते. मात्र असे असताना सुद्धा या कामगार नेते मंडळींनी पंधरा दिवस वाट न पाहता लगेचच म्हणजे 2/10/2024 रोजी उपोषण चालू केले. कामगार नेते मंडळींना पंधरा दिवस सुद्धा दम निघला नाही यांनी इतक्या घाईघाईने चक्रि उपोषण का चालु केलं..?

उपोषण चालू करून न थांबता यांनी कारखान्याचे चेअरमन व तालुक्याचे आमदार यांच्यावर खालच्या पातळीवरत टीका करून असभ्य भाषा वापरली. वास्तविक पाहता तीन वर्ष कारखाना बंद होता. पुन्हा कारखाना चालू झाला त्यावेळेस ज्यांचा कामाचा कार्यकाल पूर्ण झालेला नाही त्या सर्व कामगारांना पुन्हा काम मिळाले, त्यांचा उदरनिर्वाणीचा प्रश्न सुटला एवढेच नाही तर त्यांना 12% वेतन वाढ झाली. दर महिन्याच्या महिन्याला त्यांचा पगार होत आहे त्याबद्दल या मंडळींनी कधीही चेअरमन साहेबांचे अभिनंदन केले नाही. आज जी मंडळी कारखान्यावरती कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे ती ज्यावेळी कारखान्यावरती संचालक किंवा व्हाईस चेअरमन म्हणून होती त्यावेळी त्यांनी कामगारांना कशी वागणूक दिली हे सुद्धा कामगार नेत्यांनी तालुक्याला सांगावे. ज्यांच्या विरोधात तुम्ही कामगारांसाठी कोर्टकचेऱ्या खेळला त्या नेते मंडळींना आणुन भाषणे करायला सांगुन काय साध्य करु पाहात आहात..?

मुळातच या कामगार नेतेमंडळींना कारखान्यातील विद्यमान कामगारांनी नाकारलेले आहे. आत्ता हे आंदोलन कामगारांसाठी राहिलेले नसून पार पडत असलेल्या विधानसभा निवडणुकीतील एका विधानसभेच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविण्यासाठी चाललेला खटाटोप आहे. कारण आम्हा कामगारांचे देणे कारखान्याचे अध्यक्ष या नात्याने फक्त राहुल कुल हेच देऊ शकतात बाकी इतर मंडळी ही फक्त राजकारण करण्यासाठी संबंधित आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आत्ता यात फक्त राजकारण चाललं आहे आणि सध्या ज्या पद्धतीने आंदोलन चालू आहे त्यावरून सध्या हे आंदोलन म्हणजे कुणाची तरी भाटगिरि चालू आहे असे मलाच नाहीतर तालुक्यातील सर्व कामगार सभासद अन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला देखील वाटते आहे.

आंदोलन स्थळी वापरली जाणारी भाषा ही कोणत्याही सभ्य सुसंस्कृत माणसाला आवडणारी नाही. सध्या कामगारांनी ज्या पद्धतीने आंदोलन चालू ठेवले आहे तो मार्ग आपल्या सर्वांच्या न्याय व हक्कासाठी योग्य नाही याची जाणीव आमच्या सहकारी कामगारांनी ठेवावी. सध्या सुरू असणारी विधानसभा निवडणूक होऊन जाईल. पण तुम्ही या व्यवस्थापक मंडळींना दुखावत आहात. आपल्याला परत सुद्धा याच लोकांकडे न्यायासाठी जायचे आहे हे ध्यानात ठेवावे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर हा प्रश्न फक्त कारखान्याचे अध्यक्ष या नात्याने राहुल कुलच सोडु शकतात आणी कारखाना कामगारांचे देणी देण्यास त्यांनी कधीही नकार दिला नाही.

हे कामगारांनी नाकारलेले कामगार नेते मंडळी कामगारांची व सभासदांची दिशाभूल करीत आहेत कुणाच्या तरी सांगण्यावरून आपण जे कारखान्याचे चेअरमन आमदार राहुलदादा कुल यांना बदनाम करण्याचे षढयंत्र रचत आहात हे सर्व कामगाराचे नुकसान करणारे आहे असे मला वाटते. त्यामुळे हे आंदोलन आता आंदोलन राहिले नसून यात राजकारण आलेल आहे हे सिद्ध झालेल आहे असे मत माझ्यासारख्या बर्याच कामगारांचे असल्याचे शेवटी रवींद्र बोत्रे यांनी म्हटलं आहे.