शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पालकांसह उत्साहात स्वागत, विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि पाठ्यपुस्तके भेट

सांगली (सुधिर गोखले) : आज शाळेचा पहिल्या दिवशी जिल्ह्यातील बऱ्याच शाळांमधे विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था चालकांनी स्वागत केले गेल्या काही दिवसांपासून आजच्या दिवसासाठी संस्था चालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळा सजवण्यात व्यस्त दिसून येत होते शाळेतील वर्गांची स्वच्छ्ता निर्जंतुकीकरण विद्यार्थ्यांची सुरक्षा या बाबींकडे विशेष लक्ष देण्यात येत होते आज शाळांमधून आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या तर शाळेच्या प्रवेश द्वारावर काही ठिकाणी संस्था चालक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प दीले.

मिरज मधील दि मिरज एज्युकेशन सोसायटीच्या ,ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा आज शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात सर्व विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर शासनाकडून प्राप्त मोफत पाठ्यपुस्तकाचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंजिरी सोपल यांनी सर्व विद्यार्थिनी व पालकांचे स्वागत केले. शाळेची उज्वल परंपरा व ध्येय धोरणांची ओळख त्यांनी प्रास्ताविकातून करून दिली . संस्थेच्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशालीताई देशपांडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून नवीन शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

इ.५वी व इ.८ वी नवीन विद्यार्थिनी व पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले . शाळेतील विद्यार्थिनींनी छान वेशभूषा करून स्कूल चले हम गाण्यावर सर्वांना प्रोत्साहित केले.गणित लॅब व सायन्स पार्कमधील उपकरणांची माहिती पालकांना देण्यात आली .यावेळी सर्व विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्रशालीताई देशपांडे, मुख्याध्यापिका मंजिरी सोपल, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षक रास्ते, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, सेवक, पालक, विद्यार्थिनी उपस्थित होते.

मिरज विद्या समितीच्या विद्या मंदिर शाळेतही आज उत्साहात विद्यार्थि विद्यार्थिनीचे स्वागत करण्यात आले मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष शैलेश देशपांडे कार्यवाह अनीलभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची आणि शाळेची सुरू असलेली यशस्वी वाटचाल यावेळी मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये विशद केली यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.