पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा महासंघाच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतरवर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे जाऊन दिल्ली चे पोलीस उपायुक्तालयात भेट देऊन चर्चा केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा महासंघाकडून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाची तारीख 25 जुलै 2023 निश्चित करण्यात आली आहे.
या लाक्षणिक उपोषणाची माहिती व निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेष्ठ नेते खासदार शरद पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे खासदार सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, भारतीय जनता पार्टी रेल्वे राज्य मंत्री खासदार रावसाहेब दानवे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी सरचिटणीस व खासदार डी. राजा, भारतीय जनता पार्टी प्रवक्ते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महासचिव तारिक अन्वर, कोषाध्यक्ष खासदार मा. पवन कुमार बंसल, भारत राष्ट्र समिती पार्टी, आम आदमी पार्टी खासदार संजय सिंग तसेच जनता दल ( यु ) यांच्या कार्यालयात भेट घेऊन देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे, महाराष्ट्र राज्य युवक कार्याध्यक्ष परशुराम कासुळे, पुणे शहर सरचिटणीस मयूर गुजर उपस्थित होते.