Nitesh Rane On Sanjay Raut | संजय राऊत आमच्या नादी लागू नको ठाकरेंचे कपडे फाडू, राऊत सत्यपाल मलिक ला भेटले तर त्यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी राणे आणि भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर नितेश राणे चांगलेच भडकल्याचे दिसत असून आज आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना ईशारा देताना तुम्ही जर आरोप करायचे थांबले नाहीत तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आता कपडे फाडू असे विधान त्यांनी केले आहे. तर सत्यपाल मलिक यांना तुम्ही भेटणार आहात असे समजत असून जर संजय राऊत सत्यपाल मलिक यांना भेटत असतील तर संजय राऊत यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

आज आमदार नितेश राणे यांनी बोलताना, संजय राऊत यांनी खोटेनाटे आरोप केले, अपशब्द वापरले तर मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे कपडे फाडीन.. त्यामुळे संजय राऊत यांनी विचार करून बोलावं. भ्रष्टाचाराचे आरोप करताना मिडीयासमोर जाण्याऐवजी कोर्टात जावे आम्ही कुठे रोखले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर तर खुनाचे आरोप आदित्य ठाकरेंवर झाले आहेत हे विसरू नका. राणे काय आहेत हे तुम्हाला चांगलेच माहित आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या किंवा फडणवीस यांच्याबाबत काही बोलायचे नाही असा इशारा त्यांनी राऊत यांना दिला आहे.

कोण सत्यपाल मलिक ज्याला तुम्ही भेटायला निघाले आहेत, भारताचे नाव खराब करण्याचे काम मलिक करत आहे, तू त्याला भेटायला जातोय, तू जर त्यांना भेटायला जात असेल तर संजय राऊत यांच्यावर देश द्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी त्यांनी करत तुम्ही बेलवर बाहेर आहात, तुम्हाला कधीही आत टाकू शकतो. आजपासून भाजप च्या कोणत्याही नेत्यांना बोलला तर उद्धव ठाकरे यांचे कपडे फाडणार असा ईशारा त्यांनी दिला आहे.