मुंबई : आर्यन ड्रग्ज प्रकरण घडल्यानंतर ज्या गोष्टी नवाब मलिक यांनी पुढे आणल्या आणि त्यातून जे आरोप झाले त्यावरून समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेत नवाब मलिक यांच्यावर मानहाणीचा दावा केला आहे आणि नवाब मलिक यांना टीका टिप्पणी करण्यास मनाई करावी अशीही मागणी त्यांच्यावतीने करण्यात आली आहे.
मात्र वानखेडे यांची ही विनंती न्यायालयाने नाकारल्यासारखे दिसत असून त्यांना खडेबोल सुनावले आहेत. काल मुंबई उच्च न्यायालायत सुनावणीवेळी ज्ञानदेव वानखेडे यांचे वकील अरशद शेख यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना एका आमदारांना आम्ही का उत्तर द्यावे जे न्यायालय नाही असा सवाल उपस्थित केला होता. यावर उच्च न्यायालयाने तुम्ही सरकारी अधिकारी आहात त्यामुळे तुम्ही फक्त इतकेच सिद्ध करा की नवाब मलिक यांनी केलेले ट्विट हे चुकीचे आहे. समीर वानखेडे हे फक्त तुमचे चिरंजीवच नाही तर एक सरकारी अधिकारी आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणूसही त्यांच्या कामाची समीक्षा करू शकतो असे म्हटले आहे.
नवाब मलिक यांनी केलेले ट्विट हे खोटे आहेत हे आता वानखेडे यांना पुढील तारखेला सिद्ध करायचे आहे. नवाब मलिक यांच्यावर ज्ञानदेव वानखेडे यांनी सव्वा कोटी रुपयांचा मानहाणीचा दावा दाखल केला आहे.