किरण गोसावी आणि काशीफ खानचे व्हाट्सअप चॅट व्हायरल, काशीफ खान आणि वानखेडे यांचे नाते काय.! नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची धाड पडल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडण्यात आले आणि संपूर्ण राज्यात खळबळ माजली. हे होत असताना इकडे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे वातावरण आणखीनच तंग बनले होते.
मात्र नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर यातील अनेक बाबी समोर येत गेल्या. यातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याच्या कबुलीनामा मुळे तर सर्व प्रकरणावर शंका उपस्थित होत गेली.


आत्ता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी किरण गोसावी आणि काशीफ खान यांचे व्हाट्सअप चॅट समोर आणले असून यामध्ये हे दोघे त्या दिवशीच्या पार्टीबद्दल काही महत्वाची माहिती शेअर करताना दिसत आहेत.
नवाब मलिक यांनी काशीफ खान याच्यावरही गंभीर आरोप लावले असून तो, इतर साथीदार आणि वानखेडे यांनी हे सर्व ठरवून केले असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

मलिक यांनी हे व्हाट्सअप चॅट व्हायरल करताना काशीफ खान ची चौकशी का होत नाही, काशीफ खान आणि समीर वानखेडे यांचे नेमके नाते काय आहे असा सवाल उपस्थित केला आहे.