महाविकास आघाडीला सुप्रीम धक्का! उद्याच बहुमत चाचणी, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार की आजच राजीनामा देणार…!

मुंबई : सुप्रीम कोर्टाने आज तातडीने सुनावणी घेताना उद्याच बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार की आजच राजीनामा देणार असा प्रश्न सध्याच्या काही घडामोडिरून उपस्थित होत आहे.

असून महाविकास आघाडी सरकारने उद्‍याच म्‍हणजे गुरुवारीच ( दि. ३० ) बहुमत चाचणीला सामोर जावे, असा आदेश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला आहे. ११ जुलै राेजी बंडखाेर आमदारांवरील हाेणार्‍या कारवाईही ही पुढील सुनावणीवेळी ग्राह्य धरली जाईल, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या आदेशानंतर आता उद्‍या सकाळी 11 वाजता महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामाेरे जावे लागणार असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी महाराष्‍ट्र सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे, असे आदेश दिले होते. या विरोधात शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

न्‍यायमूर्ती सूर्यकांत आणि जे. बी.पारदीवाला यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात तब्‍बल साडेतीन तास दोन्‍ही बाजुने युक्‍तीवाद झाला. यानंतर रात्री 9 वाजता निकाल देण्याचे सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले होते. सुरुवातीला सुनील प्रभु यांच्‍या वतीने ॲड. अभिषेक मनु सिंघवी यांनी तर शिंदे गटाच्‍या वतीने ॲड. नीरज किशन कौल यांनी युक्‍तीवाद केला. तर राज्‍यपालांच्‍या वतीने सॉलिसिटर जनरल यांनी बाजू मांडली.

अखेर 8 नंतर निकाल आला आणि महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार हे पक्के झाले.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

52 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago