Categories: क्राईम

खुनाच्या गुन्ह्यात 5 वर्ष फरार असलेल्या आरोपीस कर्जत पोलिसांकडून अटक

कर्जत

कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत मोढळेवस्ती राशीन येथे जागरण गोंधळाचे कार्यक्रमात पैसे लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपिंनी संगनमत करून गैर कायद्याची मंडळी जमा करून फिर्यादीचा भाऊ आप्पा दगडू मोढळे व वडील दगडू महादेव मोढळे यांना तलवारीने, कुर्‍हाडीने, काठयाने मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये फिर्यादीचा भाऊ आप्पा मोढळे हा गंभीर जखमी होऊन फिर्यादीचे वडील दगडू महादेव मोढळे हे मयत होते त्यामुळे फिर्यादी अशोक दगडू मोढळे (रा.मोढळे वस्ती,राशीन ता कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस स्टेशन येथे विविध कलमान्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात पाच वर्षापासून फरार असलेला आरोपी विजय लक्षम मोडळे (वय 29 वर्षे. राहणार मोढळे वस्ती, राशीन) हा खेड भागात आल्याची गुप्त बातमी कर्जत पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ कर्जत पोलिस स्टेशनची टीम रवाना करून आरोपीला बातमी मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेऊन अटक केली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, सहायक फौजदार तुळशीदास सातपुते, हेडकॉन्स्टेबल अण्णासाहेब चव्हाण, पोलीस नाईक संभाजी वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे,अर्जुन पोकळे,देविदास पळसे, संपत शिंदे यांनी केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

15 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago