Categories: क्राईम

Murder | वासुंदे येथे महाराष्ट्र बँकेच्या नोटीस बजावणाऱ्या वसूली एजंटचा हत्याराने वार करून खून


दौंड : दौंड तालुक्यातील वासुंदे येथे दि.01/3/2024 रोजी रात्री 07/45 च्या सुमारास इंडीयन आँईल पंपांचे समोर महाराष्ट्र बँकेच्या नोटीस बजावणारे वसूली एजंट प्रवीण मळेकर यांचा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. याबाबत ऋषिकेश प्रवीण मळेकर यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश मळेकर  यांचे वडील दिनांक 01/03/2024 रोजी सकाळी 09:15 च्या सुमारास हिरो होन्डा पँशन मोटारसायकल नंबर MH 12 EP 9336 हीवरुन बँक आँफ महाराष्ट्र शाखा बारामती या बँकेचे रिकव्हरीचे नोटीस वाटप करण्यासाठी राहते घरातुन बारामती परिसरात गेले होते. फिर्यादी यांना एकाने फोन करुन कळिवले की, मळेकर तुमचे कोण आहेत त्यांना कोणीतरी चाकु मारला आहे व ते जखमी अवस्थेत रोडवर पडलेले आहेत. त्यांना विश्वराज हाँस्पीटल लोणी काळभोर या दवाखान्यात अँम्बुल्नसमधुन पाठवुन देत आहे तुम्ही तेथे जावुन थांबा असे सांगितले.

त्यांनतर फिर्यादी यांनी फोनवर फोन करुन सदरचा प्रकार हा कोठे झाला याबाबत विचारले असता त्यांनी सदरचा प्रकार वासुंदे गावचे हद्दीत इंडीयन आँईल पेट्रोलपंपाचे समोर बारामती फलटण रोडवर झाला असल्याचे सांगितले. रात्री 09:05 च्या सुमारास विश्वराज हाँस्पीटल येथे फिर्यादी पोहचले त्यांनतर रात्री 09:15 वा.चे सुमारास फिर्यादी यांचे वडील प्रविण मळेकर यांना अँम्बुलन्समधुन हाँस्पीटल मध्ये आणले गेले.  त्यानंतर फिर्यदिने वडील प्रविण मळेकर यांना पाहीले त्यावेळी त्यांचे पोटात कोणीतरी हत्याराने भोकसल्याने त्यांचे पोटातील आतड्या बाहेर आलेल्या दिसल्या व पाठीवर कमरेवजवळ वार झालेले दिसले.

ऋषिकेश यांनी वडीलांना हाका मारल्या असता त्यांचे कोणत्याही प्रकारे हालचाल झाली नाही त्यानंतर डाँक्टरांनी त्यांना तपासुन ते उपचारापुर्वीचे मयत आहेत असे घोषीत केले. फिर्यादी यांचे वडिलांना कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी धारदार हत्याराने भोकसुन त्यांना जिवे ठार मारुन त्यांचा खुन केल्याने दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून एक पीआय तीन पीएसआय आणि 15 कर्मचारी अशी टीम त्यावर काम करत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago